Major Tourist Attractions in Chiplun


श्री. देव जुना कालभैरव व श्रीदेवी जोगेश्वरी
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुप्रसिध्द ग्रामदैवत जागृत श्री जुना कालभैरव व श्रीदेवी जोगेश्वरीचे पुरातन मंदिर वसले आहे. हे देवस्थान श्रीक्षेत्र परशुरामांशी संबंधित आहे. कालभैरव हा श्रीहर महादेवांच्या भूतगणांचा नायक असून चिपळूण नगरी क्षेत्राचा अधिपती व रक्षक आहे. श्री कालभैरव हा भगवान श्री कालभैरव हा भगवान श्री शिवशंकरांचा मानसपुत्र असून त्यांचा अवतार आहे. तो अष्टभैरवांमध्ये सर्वात श्रेष्ठ असून काशीविश्वेश्वराचा रखवालदार आहे. त्याचप्रमाणे काशीविश्वेश्वराचे दर्शन घेण्यापूर्वी प्रथम प्रवेशद्वारापाशी असलेल्या कालभैरवाचे दर्शन घ्यावे लागते. या कालभैरवाचे दर्शन प्रथम घेऊन तद्नंतर भग्ावान श्रीक्षेत्र परशुरामांचे दर्शन घेण्याची प्राचीन प्रथा होती.

मंदिर रचना व परिसर :-

हे मंदिर दक्षिणाभिमुख आहे. मंदिरातील सर्व मुर्त्या काळया पाषाणातून घडविल्या आहेत. श्री. कालभैरव मूर्ती द्विहस्त असून उजव्या हातात तलवार व डाव्या हातात ढाल तर श्री जोगेश्वरी मूर्ती असून गाभा-याच्या दर्शनी बाजूस शुध्द चांदीचा पत्रा ठोकलेले आकर्षक मखर आहे. मंदिराच्या गाभा-यातील सभागृहात प्रवेशणा-या काळया पाषाणाच्या पाय-यांवर पाडलेल्या वर्तुळाकृती खोलगट ठशांमध्ये चांदीची नाणी बसवलेली होती.

मंदिर बांधणीत काळा दगड व गूळचुन्याचा वापर केला आहे. मंदिराचे सभोवताली जांभ्या दगडांची तटबंदी आहे. जोशी, काळे, पेंडसे, चिपळूणकर, सुखदेव, पाटकर, पोतनीस, महाकाळ, किल्लेदार, गुढेकर (शेटये), कोळवणकर आदिंचा श्रीकालभैरव कुलस्वामी आहे. श्री कालभैरवाला कळे (कौल) लावून समस्याग्रस्तांकडून तोडगा (निर्णय) विचारण्याची परंपरा आहे. अंगीकृत कार्याचे यशापश तो सांगतो अशी भाविकांची श्रध्दा आहे. हे देवस्थान शाक्तपंथीय असल्याने श्री शंकरांच्या गणांना तृत्प ठेवण्यासाठी बलिदानाची प्रथा आहे. श्री. कालभैरवाच्या सात बहिणींची मंदिरे चिपळून शहराच्या चतु:सीमेला आहेत. यात श्रीदेवी एकवीरा (वडनाका), श्री कात्रादेवी, श्री देवी भवानी, श्री शितलादेवी (गांधारेश्वर मुरादपूर), श्री महालक्ष्मी (खेंड-मिरजोळी), श्री देवी विंध्यवासिनी (रावतळे), श्री देवी करंजेश्वरी (गोवळकोट-पेठमाप) आदचा समावेश होतो.

पौराणिक काळात उन्मत भस्मासुराचा वध करण्यासाठी श्री शंकरांनी धारण केलेला अवतार म्हणजे कालभैरव. सर्व देवगणांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण ? या विषयीच्या आपापसातील वादांस प्रत्युत्तर म्हणून भगवान महादेवांनी कालभैरवाचा अवतार घेऊन श्रेष्ठत्व सिध्द केले, अशा आख्यायिका आहेत.

उत्सव परंपरा

श्री कालभैरवाचा जन्म कार्तिक वद्य अष्टमीस दुपारी एक वाजता होतो. त्यापूर्वीचे सात दिवस व जन्मदिनांचा आठवा दिवस असा आठवडाभर जन्मोत्सव साजरा होतो. शारदीय नवरात्रात दागिन्यांनी मढविलेली सोन्याची श्रींची मूर्ती विशेष विलोभनीय दिसते. नऊ दिवस भजनादि कार्यक्रमांनी रात्र जागवून नवरात्रौत्सव साजरा होतो. श्रीकालभैरवाची कोणतीही अष्टमी व चतुर्दशी या प्रिय तिथ्या असून रविवार व मंगळवार हे प्रिय वार किंवा दिवस आहेत. (अष्टमी ही जन्मतिथी, रविवार हा जन्मदिवस) हे देवस्थान माहेरवाशिणींचा पाठीराखा असून संकटसमयी धावा करताच त्यांच्या रक्षणास धावून जाते.


श्री देव केदारेश्वर


श्री देव केदारेश्वर व श्रीदेवी जाखमाता यांचे देवस्थान श्रीदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट अख्यत्यारित आहे. वैश्यवसाहतीत जीर्णोध्दारित मंदिर उभे असून सभोवती आकर्षक उद्यान आहे.


श्री देव नवा कालभैरव देवस्थान


दगडी पाया असलेले मजबुत बांधणीचे पूर्वाभिमुख देवस्थान शहराच्या बेंदरकरआळीत आहे. शके 1764 शुभकृत नाम संवत्सरे माहे श्रावण शुध्द पौर्णिमा (21 ऑगस्ट 1842) दिनी श्री लक्ष्मीनारायण मंदिरात धोंडा ठेवून त्यास नवा कालभैरव म्हणून पुजनास सुरूवात झाली.

शके 1764 माघ शु. पौर्णिमेस दुस-या धोंडयाची प्रतिष्ठापना करून (14 फेब्रूवारी 1843) त्यास श्रीदेव केदार म्हणून मानण्यास सुरूवात झाली. शके 1764 फाल्गून शु. पौर्णिमा (16 मार्च 1843) दिनी श्रीदेव नवा कालभ्ौरव व केदारनाथ, श्रीदेवी जाखमाता यांच्या काळया पाषाणातील सुमारे 2 फुट उंचीच्या मूर्ती चौथ-यावर प्रतिष्ठापित करण्यात आल्या आहेत.

सण व उत्सव

चैत्र महिन्यात चैतावली, जैष्ठ व आषाढ महिन्यात किरका मिरवणूक, श्रावणात जागर व नारळी पौर्णिमेस श्रीफळ सवाद्य मिरवणूक व जलदेवतेस अर्पण, पोवती (देवांची राखी) वाटप, अश्विन मासात शारदीय नवरात्रौत्सव, विजयादशमीस सीमोल्लंघन, दीपावली व त्रिपुरारी पौर्णिमेस दीपोत्सव, कार्तिक कृष्ण 7 ला कालभैरव जयंती तर फाल्गुन महिन्यात शिमगोत्सव साजरा केला जातो.



श्री देवी विध्यंवासिनी
रावतळे येथील डोंगरात श्री देवी विंध्यवासिनीचे पुरातन जागृत देवस्थान आहे. भारतातील बारा शक्तिपीठांपैकी विंध्यवासिनीचे मुख्यपीठ उत्तरप्रदेशात विंध्याचल येथे आहे. तिचे अंशपीठ रावतळे येथील विंध्यवासिनी आहे. पौराणिक कथेनुसार आदिशक्ति योगमायेने यशोदेच्या उदरी जन्म घेतला. इकडे वसुदेवाने श्रीकृष्णाला कंसभयाने यशोदेजवळ आणून ठेवले. वसुदेव देवकीचे अपत्य समजून तिला कंसाने शिळेवर आपटण्यासाठी उचलले त्याचक्षणी ती कंसाच्या हातातून निसटून अंतराळात गेली आणि विंध्याचल येथे प्रकटली. तीच विंध्यवासिनी देवी होय.

देवी भागवताच्या दशम स्कंधानुसार स्वयंभू मनूने पृथ्वी उत्पन्न करण्यापूर्वी क्षीरसागराचे तीरी 100 वर्षे उग्र तपश्चर्या केली असता देवी प्रकट झाली. तुझे ईप्सित साध्य होईल असा वर देऊन ती विंध्य पर्वतावर राहिली. म्हणून ती विंध्यवासिनी झाली. विंध्य पर्वतावर नित्यवास करणारी पार्वती असा अर्थ देवी कोशात दिला आहे. इ.स.8 च्या सुमारास चालुक्य घराण्यातील सम्राट पहिल्या पुलकेशिची माता हिने आपल्या माहेरी हा यज्ञ घडविला. त्याच काळात सध्याची विंध्यवासिनीची मूर्ती तिने दक्षिण भारतातून आणली असावी. असा तर्क तज्ज्ञ मांडतात. सतींच्या एकावन्न शक्तीपीठांमध्ये विंध्यवासिनी हे एकावन्नावे शक्तीपीठ असून विंध्याचल क्षेत्री देवीच्या डाव्या पायाची करंगळी हे अंग अर्पित असून त्याला शिवाचे पुण्यभाजन स्वरूप प्राप्त झाले आहे. म्हणूनच चिपळूण क्षेत्र परशुराम क्षेत्राबरोबरच यज्ञक्षेत्र आहे.

या देवस्थानमधील महिषासूर मर्दिनी मंदिरातील विंध्यवासिनी देवी शाळिग्राम मूर्ती आहे. अष्टभूजा विंध्यवासिनीची मूर्ती घोटीव, देखणी व सुबक (कर्नाटक) येथील होयसळेश्वराच्या मंदिरातील नृत्य मुद्रेतील सरस्वतीचे अंगावरील दागीने व रावतळे येथील विंध्यवासिनीचे अंगावरील दागिने यात विलक्षण साम्य आहे. रावतळे मंदिरातील विंध्यवासिनी मूर्तीच्या डाव्या हातात नाग, दुस-या हातात धनुष्य, तिस-या हातात ढाल, चौथ्या हातात रेडारूपी महिषासुराचे मस्तक धरले आहे. उजवीकडील एका हातात तलवार, दुस-या हाती चाप, तिस-या हाती बाण व चौथ्या हातात शस्त्राने महिषासुराच्या मस्तकावर आघात केला आहे. म्ाूर्तीच्या मस्तकावर छोटे शिवलिंग असून उभ्या गणेशाची मूर्ती आहे. शस्त्रघातामुळे रेडयाचे मस्तक धडावेगळे होऊन खाली पडले आहे. रेडयाच्या पार्श्वभागावर देवीचे वाहन असलेल्या वाघाने हल्ला केला आहे. असे या विंध्यवासिनी शिल्पाकृतीचे वर्णन आहे.

आदिलशाहीकालीन लढाईत मंदिरात गाढले गेले. त्यातच मूर्तीचे दोन हात खंडीत झाले. पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात शेत नांगरतांना देवीचा कळस दिसला व नंतर मंदिर प्रकाशात आले. देविची मूर्ती जमिनीखाली भुयारात होती. अंधारी गाभा-यात एका वेळी एकच माणूस दर्शन घेऊन येत असे. मंदिराविषयी काही आख्यायिका सांगितल्या जातात. एका शेतक-यास रात्री स्वप्नांत देवीने दृष्टांत दिला. त्यानूसार आपल्या शेतात नांगरणी करताना देवीची मूर्ती सापडली. तेथे त्याने छोटेसे मंदिर उभारले. दुसरी आख्यायिका अशी की, एका देवी भक्ताने उत्तर प्रदेशातील विंध्याचलावरील देवीच्या मूळस्थानी उग्र तपश्चर्या आरंभिली. त्यावर देवीने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा भक्ताने वर मागितला की तुझ्या दर्शनार्थ माझ्या वृध्दापकाळी मला येथवर येणे जमणार नाही. तेव्हा तू माझ्या गावी यावे. देवीनेही त्यास होकास दिला. परंतू अशी अट घातली की, तुझ्याबरोबर मी तुझ्यापाठीमागून येईन परंतु तू अजिबात पाठीमागे वळून पहायचे नाही. देवीची ही अट मान्य करून त्यांची मार्गक्रमणा सुरू झाली. तो भक्त रावतळे या निसर्गरम्य ठिकाणी आला असता त्यास मोह आवरला नाही आणि त्याने मागे वळून पाहिले त्याचवेळी देवी त्यास म्हणाली की, तू अटीचा भंग केला आहेस, त्याच्या मनातील चलबिचल ओळखून देवीने त्यास विश्वास दिला की, मला हे निसर्गरम्य ठिकाण आवडल्यामुळे मी येथेच वास्वव्य करणार आहे. तेंव्हापासून देवीचे येथे वास्तव्य असल्याचे म्हटले जाते.

सन 1983 मध्ये अर्धभूमीगत मंदिरावर दरड कोसळली. विंध्यवासिनी देवस्थान ट्रस्ट तर्फे जिर्णोध्दारित मंदिर वास्तूचा उद्धाटन सोहळा माघ 14 म्हणजे 1 फेब्रूवारी 1988 रोजी संपन्न झाला. सन 1992 मध्ये मंदिरावर कळसही बसविण्यात आला. मंदिराच्या पाय-या चढून वर जातांना डावीकडे अगस्ति कुंड लागते. यात बारमाही निर्झर आहे. तसेच मंदिराच्या शेजारी दोन बाजूंना असणारे धबधबे पावसाळयातील शोभा अधिक खुलवतात. या मंदिरात शारदिय नवरात्रौत्सव तसेच देवीचा जन्मोत्सव चैत्र शुध्द 12 ते वद्य प्रतिपदा या काळात साजरा केला जातो. त्याशिवाय त्रिपुरारी पौर्णिमा दर मंगळवार, शुक्रवार भाविकांची गर्दी उसळते. मंदिराच्या भोवतालची सुमारे 15 गुंठे भूखंड देव स्थानास दान करणा-या सुरेश चितळे यांची खाजगी भक्त निवास सुविधा उपलब्ध आहे.

सहा मुखी कार्तिक स्वामी


श्रीदेवी विंध्यवासिनी मंदिरात कार्तिक स्वामिंची शाळीग्राम शीला मूर्ती आहे. या मुर्तीस पुढील बाजूस पाच मुखे व पाठीमागे एक मुख असल्याने षडानन या नावानेही ओळखतात. ही मूर्ती इ.स. 1200 सालातील असून्ा पूर्वी विंध्यवासिनीव कार्तिक स्वामींचे मंदिर वेगळे होते. जीर्णोध्दारानंतर एकच मंदिर करण्यात आले आहे.

कार्तिक स्वामी जन्मताच अति हुशार व चिकित्सक होते. त्यांनी ब्रम्हदेवास ओम चा अर्थ विचारला असता ब्रम्हदेवाने 12 हजार श्लोकांत अर्थ सांगितला. त्यावेळी कार्तिक स्वामिंनी ब्रम्हदेवाला ज्ञान कमी आहे, असे सांगून शिवाकडे गेले. तेंव्हा स्वत:कार्तिक स्वामिंनी शिवाला 12 कोटी श्लोकांत अर्थ ऐकविला होता.

कार्तिक स्वामी दर्शन ~ दुर्मिळ योग

कार्तिक महिन्यात पौर्णिमा व कार्तिक नक्षत्र असा योग जुळून आल्यास त्यावेळेत कार्तिक स्वामिंचे दर्शन घेंण्याची प्रथा आहे. तसे केल्यास बुध्दामत्तावृध्दी आर्थिक समृध्दा, निरोगी आरोग्यलाभ असे फायदे होतात. अश्ाी श्रध्दा आहे. हिंदू धर्म शास्त्रानुसार कार्तिक स्वामिंचे दर्शन घेता येते. याच कारणास्तव मंदिरात विंध्यवासिनी देवीच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस इतर वेळी श्री कार्तिक स्वामिंची मूर्ती वस्त्राच्छादित असते. हा देवस्थ्ाान परिसर धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, निसर्ग पर्यटन बहरण्यास अनुकूल आहे.



आठव्या शतकातील जागृत जाज्ज्वल्य देवस्थान
श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी

शहराच्या पश्चिमेस गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याशी सुमारे 4 कि.मी. अंतरावर 8 व्या शतकातील श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरीचे भव्य मंदिर आहे. पटवर्धन, दीक्षित आदि ब्राह्मण कुटुंबियांची कुलस्वामनी असलेल्या देवीचे गोवळकोट हे सासर तर नजीकचे पेठमाप हे माहेरघर आहे.

या देवीविषयी आख्यायिका अशी की, पेठमाप येथे करंजीचे झुडूप होते. त्या जागेला शिंगासन असे म्हटले जाते. या जागेत जेव्हा देवी प्रकट झाली तेव्हा तिने एका कुमारिकेजवळ हळदीकुंकू मागितले. ते आण्ाण्यासाठी ती कुमारिका गेली असता श्री देवी गुप्त झाली आणि विद्यमान मंदिर स्थानी प्रकट झाली. नंतर श्रीदेवीने एका भक्तास स्वप्नात असा दृष्टांत दिला की, पेठमाप येथील करंजीच्या झुडूपात माझ्या नथीतील माेती अडकून राहिला आहे, तो तू घेऊन ये. त्याचप्रमाणे त्या जागेत तो मोती सापडला. करंजीच्या झुडूपात प्रकट झाली म्हणून श्री देवीला करंजेश्वरी असे नांव कायम रूढ झाले. श्रीदेवी करंजेश्वरी करंजीच्या झुडूपात प्रकट झाली म्हणून तिच्या कुळभक्तांनी करंजींचे तेल वापरू नये, असा प्रघात आहे. फाल्गुन शुध्द 13 ते फाल्गुन वद्य 1 या कालावधीत येथे मोठा यात्रोत्सव असतो.

काही ठळक ऐतिहासिक दाखले

2 मे 1699 रोजी छत्रपती राजाराम महाराज, 1700 मध्ये राणीसाहेब ताराबाई, 1701 मध्ये दादोजी मल्हार यांनी श्रीदेवीचे दर्शन घेतल्याचे इतिहासात उल्लेख आढळतात. पटवर्धनांचे मूळपुरूष हरभट यांनी प्रथम देवीची पूजा केल्याचा उल्लेख सापडतो. मार्च 1781 मध्ये इंग्रजांचा पाडाव करण्यासाठी परशुराम भाऊ पटवर्धन परिसरात आले असता त्यांनी देवीचे दर्शन घेतले होते. 27 मार्च 1849 रोजी खाशाखोत या मुस्लिम्ा धर्मियाने देवीची महापूजा केली आणि महारूद्र व श्रीसुक्त यांची आवर्तने ब्रम्हवृंदांकडून करवून घेतली असा उल्लेख सापडतो.

मिरजोळीची जाज्ज्वलता
श्री देवी महालक्ष्मी -साळूबाई


हे देवस्थान प्राचीन असून ते पूर्वी लोकवस्तीत होते. मात्र काही कारणास्तव कालांतराने मिरजोळी माळरानामध्ये नेण्यात आले. त्याकाळी फक्त अवघड पायवाट होती. मात्र आता थेट मंदिरापर्यंत डांबरी सडक आहे.

श्री. देवी महालक्ष्मी व श्री देवी साळूबाई या दोघा बहिणींची मंदिरे विभक्त आहेत. या देवींचा दरारा महान आहे. हे देवस्थान शहराच्या पश्चिमेकडील डोंगरावर अरण्यमय भागात वसलेले आहे. म्हणून त्या डोंगरास महालक्ष्मी डोंगर या नावाने ओळखले जाते. देवस्थानापर्यंत पाऊलवाटेने पोहोचण्यासाठी सात टेकडीवजा भाग पार करावे लागतात. मंदिर परिसरात काळया पाषाणावर कोरलेल्या विविध देवदेवतांच्या मुर्तींचा व शिल्पांचा समूह आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रतिकाचे यात्रोत्सवात दर्शन होते. यावेळी बैलगाडयांच्या स्पर्धाचे आयोजन केले जाते. पाग, शिरळ, वैजी, कोंढे, मालघर या गावांतील ग्रामदेवतांच्या पालख्यांची महालक्ष्मी भेट व मीलन कार्यक्रम हे या यात्रेचे खास वैशिष्टय आहे.

देवस्थानतर्फे पाच दिवसांचा शिमगोत्सव साजरा केला जातो. त्यापैकी चिपळूण शिमगोत्सवातील तीन दिवस प्रसिध्द बाजार पालखीसाठी असतात. याप्रसंगी आपल्या आईच्या भेटीस आतुर झालेल्या भक्तगण व माहेरवासिंनींचा महापूर लोटतो. विशेष म्हणजे प्रत्येक भाविकांची आरती महालक्ष्मीची पालखी स्वीकारते. अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सव देवस्थान परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले असते. चिपळूण-गुहागर रस्त्यावरील मिरजोळी गावातून थेट देवस्थानापर्यंत डांबरी रस्ता आहे. अंतर सुमारे 8 ते 10 किमी आहे. चिपळूण शहराच्या खेंड-कोलखाजण भागातून मंदिरापर्यंत डोंगर उताराची पायवाट आहे.

नवसाला पावणारी श्रीदेवी एकवीरा


पुराणप्रसिध्द भगवान श्री परशुरामांची माता श्रीदेवी एकवीरा मंदिर शहराच्या वडनाका या मध्यवर्ती भागात आहे. आज जेथे मंदिर उभे आहे त्या ठिकाणी शिवपूर्वकाळी शिवनदीजवळ शेतजमीन होती, शेत नांग्ारणी करताना श्री एकवीरा देवी श्री कालभैरवाच्या परवानगीने पाषाण रूपात जमिनीत प्रकट झाली. श्री देवी एकवीरा हा श्री देवी पार्वतीचाच एक उवतार आहे. देवीचे एक प्रसिध्द स्थान कार्ले-लोणावळा, जि. पुणे य्ोथील पर्वतांवर एका अखंड पाषाणशिळेच्या रूपात आहे. ही देवी अनेकांची कुलस्वामिनी आहे. श्री देवी एकवीरा मंदिरात दर्शनार्थ दर मंगळवार, शुक्रवार, शारदीय नवरात्रोत्सव या निमित्ताने भाविकांची गर्दी होते.

मार्कंडीचा जागृत श्री स्वामी समर्थ मठ


अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ शहरातील मार्कंडी भागात आहे मठाचा शतसांतत्सरिक उत्वव दि. 17 व 18 डिसेंबर 1974 रोजी साजरा केला गेला.

मठाचे संचालक स्वामी सेवेकरी गुरूवर्य बुवा कृष्णबुवा केळकर यांचे आजोबा सद्गुरू स्वामीभक्त वै.श्री.गोपाळबुवा केळकर तथा प्रीतिनंद स्वामीकुमार हे ज्येष्ठ शके 1796 (इ.स.1874) मध्ये श्री स्वामी सुतांचे आदेशानुसार मार्कंडी भागातील डुंग्यावर आले. तत्पूर्वी फाल्गुन शके 1795 मध्ये स्वामी सुतांनी दिलेल्या श्री स्वामी समर्थांनी सेवेकरी श्री गोपाळबुवांना आपला दंड व चांदीच्या सहवासात मुंबईला राहिले आण नंतर श्री स्वामींच्या आदेशानुसार चिपळूणला आले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्री गोपाळबुबांना एक झोळी देऊन सांगितले होते की, तू दर गुरूवारी भिक्षा माग, म्हणजे तुला काही कमी पडणार नाही. त्यानुसार ते भिक्षा मागून विर्वाह करायचें. आजही सदरहू प्रथा कायम आहे.

श्री स्वामी समर्थांच्या कृपाबल व तपसार्मथ्यामुळे गोपळबुवांनी अनेक व्याधीग्रस्त, रंजले-गांजलेले यांचे दु:ख हनन करून परमार्थाची प्रेरणा जागविण्याचे व्रत अंगिकारले. श्री स्वामींच्या श्रवणीय व दर्शनीय दिव्य लीलांचे गद्यांत कथन करून श्री स्वामी समर्थांची बखर रचली. श्री स्वामींचे भावमधुर श्री करूणास्त्रोत ओवी छंदात गायिले. साधकांच्या मार्गदर्शनार्थ साधनविवेकसारामृत हे ओवीबध्द लघुप्रकरण लिहिले. य्ाारचनांमध्ये त्यांनी स्वत:ची प्रीतीनंद अशी नाममुद्रा वापरली आहे. ती त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिली होती. गोपाळबुबालिखीत या बखरीचे मोडी लिपीत हस्तलिखित मार्कंडी मठात सुरक्षित असून त्याचे दिनविशेषी प्रकट वाचन होते.

गोपाळबुवा फाल्गुन शुध्द 11 शके 1841 रोजी समाधिस्थ झाले. मठाच्या आवारातच त्यांच्या पवित्र अस्थिंवर बांधलेली समाधी आहे. त्यांचे पश्चात त्यांचे सुपुत्र दुत्तबुवा व त्यांचे बंधु गोविंदराव व नारायणराव्ा यांच्याकडे परंपरा आली. या तिघां बंधुचे पुत्र अनुक्रमे रामचंद्र, अरूण व प्रसाद हे सद्यस्थितीत संयुक्तपणे परंपरा चालवित आहेत.

मठातील दैवत्वाची प्रचिती

प्रतिवर्षी फाल्गुन वद्य एकादशी ते चैत्र शुध्द द्वितीया असा सप्ताह श्री स्वामीसमर्थांच्या जयंती निमित्त बसतो. जन्मोत्सवाप्रसंगी गाभा-यातील श्री पादुकांवरील चांदीचे छत्र काही क्षण कंप पावते अशी अनेक स्वामीभक्तांनी प्रचिती घेतली आहे. श्री स्वामी समर्थांच्या जाज्ज्वल्याचा हा संकेतच आहे.

बाजार मारूती


शहराच्या ऐन बाजारपेठेत विराजमान असल्याने त्यास बाजार मारूती वा व्यापा-यांचा मारूती असेही म्हणतात. काही जाणकार बुजुर्ग सांगतात की, बाजार मारूती येथील जयंती उत्ववाला साधारणत: सव्वाशे त्ो दीडशे वर्षाची परंपरा आहे. पूर्वीच्या काळी सध्याच्या पानगल्ली भागातील एका कुटी (झोपडी) मध्ये साधू वास्तव्यास होता. त्याला सर्व नागरिक वेडा समजत असत. मात्र तो मारूतीचा परमभक्त होता. त्याकाळी एकदा येथील बाजारपेठेत भीषणअग्निप्रलय झाला. त्यात अनेक दुकाने व घरे उद्ध्वस्त झाली. मात्र तो साधू झोपडीसह सुरक्षित राहिला. त्या प्रसंगावरून आलेल्या प्रचितीनुसार येथील व्यापा-यांनी एकवटून त्या झ्ाोपडीच्या ठिकाणी हनुमान मंदिर उभारले. कालांतराने मंदिराची नियमित देखभाल व सेवेसाठी न्यास (ट्रस्ट) स्थापन केला.

मंदिरास हवेशीर प्रशस्त सभामंडप असून सभागृहाच्या जमिन पातळीपेक्षा सुमारे 2 फुट खोलीवर गाभारा आहे. गाभा-यावर घुमटी बांधलेली आहे. गाभा-यात असलेली निर्विकार पाषाणमूर्ती शेंदूरचर्चित आहे. घुमटीनजिकच श्रीराम, सीतामाई व लक्ष्मण यांच्याही मूर्ती एका चौथ-यावर प्रतिष्ठापित केल्या आहेत. हनुमान जयंती उत्वव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो.

वेस मारूती
शहराच्या मार्कंडी भागातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राशेजारी वेस मारूती मंदिर आहे. परंतु चिपळूण हे खेडेगाव असताना अगदी सुमारे 35 ते 40 वर्षापर्वीपासून सद्यस्थितीतील या मारूती मंदिरापर्यंत चपळूणची सीमा होती. सीमेवर म्हणजेच वेशीवर असलेला मारूती त्यास वेस मारूती हे नाव रूढ झाले.

देवस्थानास सुमारे 200 वर्षाचा इतिहास लाभल्याचा काही जाणकार बुजुर्ग सांगतात. हे मंदिर साडविलकर यांच्या खाजगी मालकीचे असून रचना टुमदार आहे. या जागृत देवस्थानाच्या गाभा-यात काळया पाषाणाची शेंदूरचर्चित वीर मारूतीची मूर्ती आहे. मंदिराच्या प्रांगणात पुरातन अश्वत्थ (पिंपळ) वृक्ष् असून त्यासभोवती दुटप्पी प्रशस्त गोलाकार पार आहे. हनुमान जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो. प्रफुल्लित वातावरणामुळे या परिसरात अनेक नागरिक भक्तीभावाने वेळ व्यतीत करतात.

सतत 80 वर्षे श्रीकृष्ण व्याख्यानमाला जोपासणारे
रामदासस्वामी स्थापित श्री लक्ष्मी-नारायण मंदिर


शहराच्या बापट आळी प्रभागात श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित सुप्रसिध्द श्री लक्ष्मी-नारायण मंदिर वसले आहे. या देवस्थानाची स्थापना सुमारे 350 वर्षापूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी केली.

वैशिष्टयपूर्ण सण व उत्सव जोपासना

श्रीरामनवमी जन्मोत्सव व चैत्र शुध्द प्रतिपदा ते चैत्र शुध्द दशमी या कालावधीत साजरा केला जातो. श्रीरामजन्मकालपश्चात दुपारी पालखी मिरवणूक (छबिना) अत्यंत शिस्तबध्द रितीने संपन्न होतो. या मिरवण्ाूकीचा मार्ग नवाकालभैरव-वेसमारूती-गौतमेश्वर-वडनाका-गणपती मंदिर-राऊतआळी मार्गे पुन्हा देवस्थान असा असतो. ही मिरवणूक भजन नामस्मरण व सवाद्य असते. मिरवणूकीनंतर सर्व भाविकांना कैरीचे पन्हे प्राशन करणेसाठी देण्याची प्रथा आहे. रामनवमीचे दुसरे दिवशी दशमीस महाप्रसाद व रात्रौ स्थानिक कलाकारांतर्फे पौराणिक व ऐतिहासिक नाटयकृती सादर करण्याची परंपरा आजही जोपासली जाते. काकडारती उत्सव कार्तिक महिन्यातील कार्तिकस्नानारंभ दिवसापासून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुस-या दिवशीपर्यंत साजरा होतो. त्रिपुरारी पौर्णिमेस रात्रौ उपरोक्त मार्गानुसार पालखी मिरवणूक निघते. सुमारे 80 वर्षे अव्याहीपणे अशी श्रीकृष्ण व्याख्यानमाला सुरू असलेले हे प्रसिध्द मंदिर आहे. या मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात श्री मारूतीचे छोटे मंदिर असून मारूतीची दृष्टी श्रीदेव लक्ष्मी-नारायणाकडे आहे. बंदिस्त गाभा-यात लक्ष्मीनारायणाची संगमरवरी पाषाणाची रेखीव मूर्ती आहे.

चिपळूण पोलीस स्थानकातील श्रीमहापुरूष


साधारणत: चिपळूण तालुक्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये श्री महापुरूषांचे स्थान आहे. अंदाजे 10 बाय 10 चा गाभारा, वर शिखर नाही. आत भिंतीला लागून ँ़ असे लिहून पुढे छोटी पाषाणशिला व छोटी शिव्ालिंग असे स्वरूप बहुतांश ठिकाणी आढळते. शहरातील पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या भिंतीचे वर शिवाजी महाराज व रामदास स्वामींचे चित्र काढले आहे. आत टाईल्स लावलेल्या देवळीच्या मागे औदुंबर व अावळयाचे झाड आहे.

खर्डीचे दत्तमंदिर


शहरानजीक असलेल्या खेर्डी येथे श्री दत्त मंदिर आहे. या गाभा-यात नामदेव, पुंडलीक, गणपती, पद्मनाभस्वामी, अग्नीदेव, बसलेला मारूती, मोहिनी अशा मूर्ती आहेत. प्रवेशद्वारापाशी शिवलिंग व नंदी आहे.

सभामंडपात प्रत्येक खांबावर 25 सेंमी. उंचीच्या दशावतारांच्या मूर्ती बसविलेल्या आहेत. बाहेर ऋषींच्या मूर्ती आहेत. भिंतींवर श्रीकृष्णाचे विराटरूप असा देखावा सिमेंटमध्ये करून तो रंगविला आहे. गाभा-यात विठ्ठलरखुमाई, श्रीराम सीता व इतर मूर्ती आहेत.

ओझरवाडीची संतोषीमाता


मुंबई-गोवा हायवेजवळ असलेल्या एका उंच टेकडीच्या उतारावर हे छोटे पण स्वच्छ, प्रसन्न मंदिर आहे. वेगळया प्रकारचे डिझाईन असलेल्या चौथ-यावर संतोषी मातेची 50/60 सेमी उंचीची ही मूर्ती असून 2 हातात तलवार व त्रिशूळ अशी आयुधे आहेत. एका हातात शिवपिंडी व चौथा हात आशिर्वादात्मक आहे. 1989/90 मध्ये हे मंदिर बांधले. टेकडीचा एक भाग फोडूनच हे देऊळ बांधले आहे. समोर 15 मीटर बाय 15 मीटरच्ो सारवलेले अंगण आहे. गाभा-यावर साधे पण उंच शिखर असल्याने हे मंदिर लांबूनही छान दिसते.

रामदास स्वामी संप्रदायाचे श्री राम मंदिर


शहरातील वैश्य वसाहत प्रभागामध्ये श्री समर्थ रामदास स्वामी सांप्रदायिक, सज्जनगड (सातारा) शिष्यगण गुरूपरंपरेतील श्रीराम मंदिर सन 1817 मध्ये स्थापन करण्यात आले आहे. कोकण प्रांतात तत्काळी श्रीरामदासी संप्रदायाचे कै. गंगाशेठ शेटये हे एक प्रमुख प्रचारक होते. म्हणून त्यांना गोसावी असे संबोधित असत. त्यांना त्यांच्या वृध्दापकाळात स्वत: श्री समर्थ रामदास स्वामींनी पुजेसाठी श्रीराम पादुका प्रदान केल्या. त्यांनी त्या प्रथम श्री लक्ष्मी नारायण मंदिरात ठेवल्या. तद्नंतरच्या काळात त्यांचा पणतू कै. शेटयाप्पा शेटये यांनी सद्यस्थितीत वैश्य वसाहतीतील श्रीराम मंदिर बांधले व पादुकांची प्रतिष्ठापना करून स्वतंत्रपणे श्रीराम जन्मोत्सव व इतर उत्सव कार्यक्रमास प्रारंभ केला.

श्री समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य कल्याण स्वामी यांचे शिष्यगण परंपरेतील पणतू श्री लक्ष्मण स्वामी यांनी सज्जनगडावरून येथे संगमरवरी पाषाणाच्या श्रीराम, सीता, लक्ष्मण, मारूती यांच्या मूर्ती आणल्या. त्यांच्याच शुभहस्ते सदर मूर्तींचा प्रतिष्ठापना सोहळा याच मंदिरात मंगल वातावरणात संपन्न झाला. त्या वेळेपासून श्रीराम जन्मोत्सवाचे निमित्ताने गुरू प्रसाद व संगीत, प्रधान, पौराणिक व ऐतिहासिक महान नाटयकृती स्थानिक कलाकरांनी सादर करण्याची भव्य परंपरा आहे. मंदिरात दैनंदिन व सायंकाळी दिवाबत्ती लावून श्रीराम रक्षा पठण होते.

मंदिराची रचना

या पश्चिमाभिमुख मंदिराची वास्तू चिरेबंदी आहे. छप्पर लाकडी व कौलारू स्वरूपाचे आहे. मंदिरासमोरील तीन पैकी कमानीतून आत प्रवेश केल्यावर श्रीरामांचे दर्शन घडते. सभामंडप सुमारे 5 न् 20 फूट लांब व रूंद आहे. सभामंडपामध्ये तत्कालिन चिपळूणातील प्रसिध्द चित्रकारांनी स्वहस्ते चितारलेली पौराणिक दृष्यांची चित्रे आहेत. मंदिराचा गाभारा सुमारे 10 न् 10 फूट लांब रूंद आहे. गाभा-यात श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, व श्री मारूती यांच्या मूर्ती असून प्रदक्षिणा मार्ग आहे. गाभा-याच्या लाकडी दर्शनी भागावर सुंदर नक्षीकाम केले आहे. गाभा-याच्या प्रवेशद्वारावर श्री समर्थ रामदास स्वामींची प्रतिमा आहे. मंदिराचा अंतर्भाग महालासारखा भासतो. गाभा-याच्या प्रवेशद्वाराजवळ जमिनीलगत दोन कमानी (देवळया) आहेत. एका देवळीमध्ये श्री विठ्ठल रखूमाई तर दुस-या देवळीत श्री दत्तात्रेयांची मूर्ती आहे. मंदिराचे उजव्या बाज्ाूस दक्षिणाभिमुख मारूती मंदिर आहे.

चिपळूणचा शिमगोत्सव


अखिल महाराष्ट्रात चिपळूणचा शिमगोत्सव प्रसिध्द असून अलिकडच्या काळात बडया पर्यटन प्रवासी संस्था या कालावधीत पर्यटकांना आणत असल्याने अधिकच रंगत वाढू लागली आहे. शहराचे ग्रामदैवत व रक्षणकतार् श्री देव कालभैरव आणि श्री देव सोमेश्वर व श्री करंजेश्वरी येथील शिमगोत्सव वैशिष्टयपूर्ण व पारंपारिक संस्कृती टिकवल्याने वर्षानुवर्षे गर्दीचा उच्चांक प्रस्थापित करता आहे.

होळीच्या दिवशी श्री कालभैरव व श्री केदार यांची पालखी सजविली जाते. त्यानंतर त्याच दिवशी ठिकठिकाणाहून आणलेली लाकडे रचून होम तयार केला जातो. या होमाची ब्राह्मणांकडून व देवाच्या पुजा-यांकडून यथासांग पूजा केली जाते. शहरातील हजारो नागरिक यावेळी एकत्र जमतात व होमाची प्रार्थना करतात. साधारण रात्रौ ठीक 12 वाजता होमाला अग्नी दिला जातो. त्यानंतर त्या धगधगत्या होमामध्ये श्री कालभैरवाच्या नावाने अर्वजण आपापल्या घरांतून आणलेले नारळ त्यात टाकतात. पेटत्या अग्नीमध्ये टाकलेले नारळ काढण्यासाठी तरूण वर्गात जोरदार स्पर्धा सुरू होते. होळीच्या दुस-या दिवसा पासून श्री काल्ाभैरव व श्री केदार यांची पालखी शहरभर फिरायला सुरूवात होते होळीच्या दिवसापासून श्रींची पालखी दारात येणार म्हटल्यावर त्या त्या दिवशी उपनगरात प्रचंड आनंदी आनंद असतो. घरोघरी दीपावली प्रमाणे दिव्यांची रोषणाई केली जाते. ज्या दिवशी पालखी येणार असेल त्या दिवशी सर्वजण आपापल्या घरासमोरच्या अंगणातील जमीन शेणाने सारवून तिथे रांगोळी काढली जाते. पालखी दारात आल्यावर त्या पालख्ाीच्या चारही पायावर पाणी टाकले जाते व त्यानंतर घरांतील सर्व सुवासिनी श्री कालभैरवाची मनोभावे पूजा करतात. नारळ व खण देवासमोर ठेवला जातो. वर्षापेक्षा लहान असणा-या मुलांना पालखील टाकून नवस फेडले जातात.

श्री देवी महालक्ष्मी व श्री कालभैरव यांची भेट

पाच दिवसांच्या कालावधीत शहरात अनेक ठिकाणी तमाशा, नमन, भजन m असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेष आकर्षणाची बाब म्हणजे पाच दिवसात दोन दिवस बाजार पालखी असते. ही बाजारपालखी संध्याकाळी सातला सुरू होऊन सकानी नऊ दहावाजेपर्यंत चालते. बाजार पालखीच्या दुस-या दिवशी देवी महालक्ष्मी व श्री कालभैरव यांची भेट रात्रौ 1 ते 4 दरम्यान चिपळूणच्या खेंड उपनगरात होते. या वेळी श्री देवी महालक्ष्मीची ओटी भरणे मानाचं समजल जाते. ही मानाची ओटी भरण्यासाठी स्त्रियांची खूप गर्दी होते. दूर दूर गावाहून देवी महालक्ष्मीच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी अनेक कुटुंबे खास चिपळूण येथे वास्वव्य करण्यासाठी येतात.

नवसाला पावणारी महालक्ष्मी देवी

खेंडीतील जाखमाता मंदिरापासून महालक्ष्मीच्या पालखीला संध्याकाळपासून सुरूवात होते. त्याच रात्री तिची भेट श्री कालभैरव यांच्याशी झाल्यानंतर खेंडीतील रस्त्याने तिची पालखी परांजपे हायस्कूलकडूल चौक विभागाकडे जाते. श्री देवी महालक्ष्मीचे मंदिर खेंड विभागातील डोंगरावर असून अनेकजण तेथे जाऊनही तिचे दर्शन घेऊ शकतात. देवीकडे व्यक्त केलेली इच्छा नेहमीच पूर्ण होते असा अनेक भाविकांचा समज आहे. विशेषत: महिलावर्गात चिपळूणची ही देवी विशेष लोकप्रिय आहे.

करंजेश्वरीचा शिमगोत्सव

गोवळकोट पेठमाप मधील ग्रामस्थांचे श्री देवी करंजेश्वरी हे ग्रामदैवत आहे. त्यामुळे या देवीचा शिमगोत्सव लोंकासाठी एक पर्वणी ठरते. शिमगोत्सवाला चाकरमानी प्रचंड गर्दी करतात. फाल्गुन शुक्ल त्रयोदशीला प्रारंभ होतो. या दिवशी सायंकाळी श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरीच्या पालख्या मंदिराच्या बाहेर पडतात. तत्पुर्वी मंदिरामध्ये येसूचे नृत्य होते. ढोलताशांच्या गजरात पालख्या मशिदीजवळ जातात. त्या ठिकाणी मुस्लिम समाजातील मानकरी चौघुले यांच्या वतीने देवीची पूजा केली जाते. त्यानंतर होळी लावली जाते व पालखी गोविंदगडावर श्री रेडजाई देवीच्या भेटीसाठी जाते. तेथे जगताप या मानक-यांच्या वतीने देवीची पूजा केली जाते. गोविंदगडावरून उतरल्या नंतर लोकांच्या आरत्या स्वीकारीत पालख्या पेठमापाच्या दिशेने रवाना होतात. पेठमाप हे देवीचे माहेर समजले जाते. रात्री तमाशाचा कार्यक्रम असतो. त्याठिकाणी हजारो भाविक महिला खणानारळाने देवीची ओटी भरतात आणि नवस बोलतात

शेरणे कार्यक्रम

मुक्कामाच्या रात्री नवस बोलणा-यांना देवस्थानाकडून एक नारळ दिला जातो. हा नारळ गुप्तपणे शिमगा सणाच्या ठिकाणी वाळूमध्ये पुरला जातो. या नारळा भोवती पिवळा फडका गुंडाळला जातो. त्यामध्ये भक्तांच्या नावाचा कागद व दक्षिणा असते. दुस-या दिवशी पालख्या वेगाने फिरून ज्यांचे नवस पूर्ण होणार असतील त्यांचे शेरणे (नारळ) शोधून काढतात. त्या भाग्यवानाचे नाव जाहिर केले जात्ो. ही शेरणे ढाल काठीने काढली जातात. जापर्यंत सर्व शेरणे काढली जात नाहीत, तापर्यंत पालख्या जागेवरून हलत नाहीत. सर्व शेरणे काढल्यानंतर पालखी गोवळकोटच्या दिशेने जायला निघते. एका वर्षी एका भाविकाचे शेरणे काढण्याचे बाकी राहिले. पालख्या गोवळकोटला नेण्यात आल्या परंतु पालख्या प्रचंड वेगाने शेरणे काढण्यासाठी पेठमापात धावत आल्या असे उदाहरण जुन्या विश्वस्तांकडून सांगितले जाते. हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात. पेठमाप भागात जत्रेचे स्वरूप येते. रात्रभर लाकांच्या आरत्या स्वीकारीत पालख्या गोवळकोटला परत येतात. वाटेत नाक-यांच्या आरत्या होतात. दुस-या दिवशी सकाळी भद्रेचा होम लागतो. या कार्यक्रमानंतर पालख्या गोवळकोट येथील सहाणेवर विराजमाण होतात. त्यानंतर पालख्यांच्या कार्यक्रमानंतर महिलांच्या वतीने दिवसभर आरत्या होतात. सायंकाळी जत्रा भरते. पालख्या मंदिराच्या दिशेने प्रचंड गर्दीत रवाना होतात. गोवळकोट हे देवीचे सासर मानले जाते. त्यामुळे सोमेश्वराची पालखी मंदिरामध्ये जाते तरी देवीची पालखी जात नाही. ती पालख्ाी मंदिराभोवती आणखी एक जादा फेरी घेते. संपूर्ण पालखी काठयांवर उचलून धावत असते. हा प्रकार पहाण्यासाठी गर्दी होते. या शिमगोत्सवात ठिकठिकाणी येसूचे नृत्य होते. पालख्या मंदिरात शिरल्यानंर शिमगोत्सवाची सांगता होते. यानंतर रंगपंचमीच्या दिवशी सर्व घरात ढोलकाठीची पूजा केली जाते. येसूचे नृत्य होते व रंगपंचमी साजरी केली जाते. या काळात पालख्या वाहणा-या भोई समाजातील लोक व स्वयंसेवकांच्या कष्टाला सीमाच उरत नाही. फाल्गुन शुध्द पंचमीला सुरू झालेला हा उत्सव रंगपंचमीस संपतो. भक्ती आनंद व्रतवैकल्ये उत्साह आणि जल्लोष याचा सुरेख संगम साधलेला हा उत्सव आजही आपले पुरातन अस्तित्व टिकवून आहे.

चाकरमामान्यांचा प्रतिसाद

एकूण तसं पाहिलं तर होळीपासून ते रंगपंचमीमर्यंत शिमग्यासाठी खास मुंबईहून हजारो चाकरमानी चिपळूणला येतात व शिमग्याचा आनंद मनमुराद लुटतात.

No comments:

Post a Comment